सप्तमीला श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १२ ऑक्टोबर (वार्ता.) – सप्तमीला श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री भवानीदेवीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिले होते.