मुंबई पोलीस माझ्यावर पाळत ठेवत आहेत ! – समीर वानखेडे, अधिकारी, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक

डावीकडून दिलीप वळसे-पाटील यांनी समीर वानखेडे

मुंबई – मुंबई पोलीस माझ्यावर पाळत ठेवत आहेत, अशी तक्रार केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे ११ ऑक्टोबर या दिवशी केली. याविषयीचे सीसीटीव्ही चित्रणही उपलब्ध असल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याची सूचना कुणालाही दिली नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.