श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हणणार्या भीम आर्मीच्या नेत्याला अटक
|
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) – श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हटल्याच्या प्रकरणी येथील भीम आर्मीचा नेता अनिल चौधरी याला अटक करण्यात आली. अनिल चौधरी हा भीम आर्मीच्या ‘आझाद समाज पार्टी’चा जिल्हाध्यक्षही आहे. हिंदु वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौधरी याला अटक करण्यात आली. अटकेच्या भीतीने त्याने ट्वीट करून क्षमा मागण्याचा प्रयत्न केला होता. ‘माझा कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. ही पोस्ट चुकून झाली’, असा दावा त्याने केला.
#UPPolice #FirozabadPolice नवरात्रों के पावन दिनों में माँ दुर्गा जी पर अशोभनीय पोस्ट करने वाले अभियुक्त अनिल चौधरी को गिरफ्तार कर भेजा गया जेल । pic.twitter.com/YvuNnuxRVw
— Firozabad Police (@firozabadpolice) October 10, 2021