ऑनलाईन फसवणुकीची माहिती तात्काळ बँकेला दिल्यास पूर्ण रक्कम परत मिळवू शकता ! – रिझर्व्ह बँक
नवी देहली – भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कुणासमवेत ऑनलाईन फसवणूक झाली असेल, तर पूर्ण पैसे परत मिळवू शकतो; मात्र यासाठी सतर्क रहाणे आवश्यक आहे. फसवणुकीविषयी बँकेला त्वरित माहिती देणे आवश्यक आहे.
१. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांमुळे तुमची हानी झाली असेल आणि तुम्ही लगेच तुमच्या बँकेला कळवले, तर हानीसाठीचे तुमचे दायित्व मर्यादित किंवा शून्यदेखील असू शकते.
२. बँकेला ठराविक वेळेत फसवणुकीची माहिती दिल्यावर ग्राहकांच्या खात्यातून फसवणूक करून काढण्यात आलेली रक्कम १० दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यात परत केली जाईल. एखाद्या ग्राहकाला ४ ते ७ दिवसांनी बँक खात्यात फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर त्याला २५ सहस्र रुपयांपर्यंतची हानी सहन करावी लागेल.