काश्मीरमधील अल्पसंख्यांकांच्या हत्या आणि हिंदूंचा नरसंहार यांविरोधात पुणे येथे आंदोलन !
पिंपरी (पुणे) – काश्मीर खोर्यात नुकत्याच झालेल्या हिंदू आणि शीख या अल्पसंख्यांक समुदायामध्ये भीतीची लाट निर्माण झाली आहे आणि त्या समुदायाचे आणखी एक स्थलांतर चालू झाले आहे. काश्मीरमधील अल्पसंख्यांक समुदायाला न्याय मिळावा, त्यांचे संरक्षण व्हावे, तसेच वंशविच्छेद थांबावा यासाठी १० ऑक्टोबर या दिवशी पुण्यातील काश्मिरी हिंदू आणि अन्य नागरिक यांनी मोठ्या संख्येत पिंपरी येथील आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने केली. ‘काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाला आहे, हे प्रथम अधिकृतरित्या मान्य करावे लागेल. ज्या जिहादमुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्या जिहादच्या मुळावर प्रहार करावा लागेल, अन्यथा काश्मीरच्या विकासाला काहीच अर्थ रहाणार नाही’, अशी मागणीही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी सरकारला केली. या वेळी ‘पनून काश्मीर’चे रोहित भट, ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक राहुल कौल, ‘काश्मिरी हिंदू सभा, पुणे’ चे अध्यक्ष श्री. आय. के. कौल, तसेच मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदू सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
या वेळी विविध मागण्यांच्या फलकांसह एक मानवी साखळी सिद्ध करण्यात आली आणि भ्रमणभाषच्या ‘फ्लॅश लाइट’सह मोठे बॅनर प्रदर्शित करण्यात आले. तसेच विविध घोषणा देण्यात आल्या.