परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करवून घेतलेली आदिशक्तीची उपासना !
सनातनचे साधक संख्येने अल्प असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांनी ‘धर्मरक्षणासाठी अनेक मोहिमा, न्यायालयीन लढे, आंदोलने’, असे अनेक यशस्वी लढे दिल्यामुळे त्यांच्यातील तेज जागृत होणे आणि ही आदिशक्तीचीच उपासना असणे : ‘आदिशक्ति म्हणजे धैर्य, पराक्रम आणि विजय होय ! सनातन संस्थेमध्ये बहुतांश साधिका आहेत आणि त्या अधिकाधिक घर सांभाळणार्या आहेत. सनातनमध्ये असलेले युवा साधक समाजातील सर्वसामान्य लोकांप्रमाणे साधे आहेत. सनातन संस्थेमध्ये ‘बाहु, धन किंवा राजकीय’, असे कुठलेही बळ नाही; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये भावभक्तीरूपी बळ सिद्ध केले आहे. या भावभक्तीरूपी बळामुळे काही सहस्र असलेल्या सनातनच्या साधकांनी धर्मरक्षणासाठी ‘यशस्वी मोहिमा, आंदोलने, न्यायालयीन लढे, मंदिर भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा’, असे अनेक लढे दिले आहेत. याच समवेत सर्वसामान्य असणार्या सनातनच्या साधकांनी परात्पर गुरुदेवांच्या कृपेने धर्मजागृतीसाठी असामान्य अशा हिंदु धर्मजागृती सभेत सहभाग घेतला. परात्पर गुरुदेवांनी मोहिमा, आंदोलने, धर्मसभा इत्यादी माध्यमांतून साधकांमध्ये वीरत्व निर्माण केले आहे. गुरुदेवांनी एकप्रकारे साधकांकडून आदिशक्तीची उपासनाच करवून घेतली आहे. जेथे धैर्य आहे, तेथे आदिशक्ति असतेच !
या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
– श्रीदुर्गासप्तशक्ति, अध्याय ५, श्लोक ३५
अर्थ : जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये तृष्णारूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.’
– श्री. विनायक शानभाग, बेंगळुरू (२३.९.२०२१)