नगर येथील भिंगार छावणी परिसरात आग !
नगर, १० ऑक्टोबर – येथील भिंगार छावणी परिसरातील सदर बाजारालगत असलेल्या नेहरू मार्केटला ९ ऑक्टोबरला पहाटे भीषण आग लागली. त्यामध्ये २४ दुकाने जळाली, तसेच कोट्यवधी रुपयांची हानी झाली. अग्नीशमनदलाची वाहने आली; मात्र आगीचे उग्र स्वरूप पाहून त्यांनी साहाय्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, राहुरी नगरपालिका, तसेच सैन्याच्या वाहन अणुसंशोधन आणि विकास विभागाची अग्नीशमनदलाची वाहने बोलावली. दोन-तीन घंट्यांच्या अथक प्रयत्नांतून आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजले नाही.