अष्टांग साधनेची देऊनी शिळा गुरुदेव तारिती साधका ।
रामनामाच्या शिळा देऊनी रामरायाने तारिले वानरा ।
अष्टांग साधनेची देऊनी शिळा गुरुदेव तारिती साधका ।। १ ।।
वानरासम प्रभु सहवास लाभला आम्हाला ।
भाग्यवंत जीव आम्ही मोल नसे भाग्याला ।। २ ।।
आनंदे करू आम्ही ही प्रभु चरणसेवा ।
शबरीसम भावाचा ओलावा राहू दे अंतःकरणात ।। ३ ।।
खारूताईसम सेवा, तळमळ अखंड जागृत राहू दे ।
तूच दिलेले तुझेच सारे तव चरणीच अर्पण होऊ दे ।। ४ ।।
तुझे मजकडे पहाणे, अमृत मधुर बोलणे, मोहक हसणे, सारेच रे अवर्णनीय ।
सार्याच या आठवणीत तुझ्या वर्तमान क्षण क्षण व्याप्त होऊ दे ।। ५ ।।
इतुकेच देवा देई दान मज आणि नको काही ।
मन माझे सदैव देवा तुझ्याच चरणी राही ।। ६ ।।
– कु. स्वाती गायकवाड, (आताच्या सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०२०)