‘महाराष्ट्र बंद’मध्ये शिवसेना सहभागी होणार ! – अरविंद सावंत, खासदार, शिवसेना
मुंबई – ‘महाराष्ट्र बंद’मध्ये शिवसेना सहभागी होणार आहे. केंद्र सरकार गरिबांची फसवणूक आणि शेतकर्यांची पिळवणूक करत आहे. त्याचा परमोच्च बिंदू लखीमपूर खीरी येथील घटनेने गाठला आहे. हा लोकशाहीवरचा डाग आहे. शेतकर्यांना चिरडून टाकणारे कृषी कायदे, कामगारांना उद्ध्वस्त करणारे कामगार कायदे यांसह देशात खासगीकरण चालू आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद पुकारण्यात आला आहे, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाविकास आघाडीतील पक्षांनी ११ ऑॅक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते.