उत्तरप्रदेश पोलिसांच्या मारहाणीमध्ये व्यावसायिकाचा मृत्यू !
खुनी पोलीस !
‘कानपूर (उत्तरप्रदेश) येथील ३६ वर्षीय व्यावसायिक मनीष गुप्ता गोरखपूर येथे फिरण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. यामुळे ६ पोलिसांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे सर्व पोलीस सध्या पसार आहेत. गोरखपूरच्या रामगढताल भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये मनीष गुप्ता हे प्रदीप चौहान आणि हरदीप सिंह या त्यांच्या मित्रांसमवेत आले होते. हॉटेलमध्ये चौकशीसाठी आलेल्या पोलिसांसमवेत रात्री गुप्ता यांचा काही कारणावरून वाद झाला. यानंतर पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली.’
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा. |