‘चुकांचे प्रमाण अल्प आणि अधिक असणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक ठेवलेल्या पाकिटांकडे पाहून अन् ती पाकिटे हातात घेतल्यावर काय जाणवते ?’, याविषयी साधकांनी केलेला सूक्ष्मातील प्रयोग !
‘अध्यात्मात परिपूर्ण सेवा करण्याला महत्त्व आहे. परिपूर्ण अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर साधकाची प्रत्येक कृती अचूक व्हायला हवी. साधना करून त्याच्याशी एकरूप होण्यासाठी सेवा चुकांविरहित करणे आवश्यक आहे. सेवेत चुका झाल्यामुळे रज-तम वाढून सात्त्विकता न्यून होते. अध्यात्मातील हे सूत्र अधोरेखित करणारा सूक्ष्मातील एक प्रयोग सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात घेण्यात आला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भात सेवा करणारे १३ साधक आणि अन्य सेवा करणारा १ साधक, अशा एकूण १४ साधकांनी हा सूक्ष्मातील प्रयोग केला.
१. प्रयोगाचे स्वरूप
अ. २२.५.२०२१ या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ‘अ’ असे लिहिलेल्या बंद पाकिटात ठेवण्यात आला होता. या दैनिकात २ चुका झाल्या होत्या. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिल्या होत्या.
आ. २४.५.२०२१ या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ‘आ’ असे लिहिलेल्या बंद पाकिटात ठेवलेला होता. या दैनिकात १५ चुका झाल्या होत्या. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिल्या.
‘चुकांमुळे दैनिकाच्या सात्त्विकतेवर कसा परिणाम होतो’, हे साधकांच्या लक्षात येण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘वरील पाकिटांकडे पाहून आणि ती हातात घेतल्यावर साधकांना काय जाणवले ?’, याविषयी प्रयोग करण्यात सांगितले. साधकांनी केलेल्या प्रयोगाविषयीचे विवरण पुढे दिले आहे.
२. २२.५.२०२१ या दिवशीचा अल्प चुका असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ठेवलेले ‘अ’ पाकीट
२ अ. आलेल्या त्रासदायक अनुभूती
२ अ १. आध्यात्मिक त्रास नसलेले साधक
२ अ १ अ. पाकिटाकडे पाहिल्यावर : ‘माझ्या छातीत थोडी धडधड झाली. माझा श्वासोच्छ्वास गतीने होत असल्यासारखे वाटले.’ – श्री. नीलेश
२ आ. आलेल्या चांगल्या अनुभूती
२ आ १. आध्यात्मिक त्रास असलेला साधक
२ आ १ अ. पाकिटाकडे पाहिल्यावर : ‘मला शांत आणि चांगले वाटले.’ – एक साधक (‘साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्याचे उत्तर योग्य आले. नामजपादी उपाय पूर्ण झाल्यानंतर त्याने हा प्रयोग केला होता.’ – संकलक)
२ आ २. आध्यात्मिक त्रास नसलेले साधक
२ आ २ अ. आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्याचे जाणवणे
२ आ २ अ १. पाकिटाकडे पाहिल्यावर
अ. ‘माझ्या छातीवरचे दडपण न्यून झाले.’ – कु. सायली
आ. ‘मला ‘माझे डोके हलके होऊन पांढरा प्रकाश शरिरात जात आहे, तसेच डोक्यावरील त्रासदायक आवरण दूर होत आहे’, असे जाणवले.’ – श्री. भूषण
२ आ २ अ २. पाकीट हातात घेतल्यावर : ‘मला माझ्या हातातील त्रासदायक स्पंदने निघून जात असल्याचे जाणवले.’ – श्री. विक्रम
२ आ २ आ. इतर चांगल्या अनुभूती
२ आ २ आ १. पाकिटाकडे पाहिल्यावर
अ. ‘माझे लक्ष श्वासावर केंद्रित झाले.’ – श्री. प्रशांत
आ. ‘माझा नामजप एका लयीत झाला. त्या वेळी माझ्याकडून दीर्घ श्वास घेतला जात होता. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण येऊन माझी भावजागृती झाली.’ – श्री. भूषण
इ. ‘आम्हाला ‘पाकिटातून सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले.’ – श्री. उमेश, श्री. विक्रम आणि सौ. समीक्षा
ई. ‘मला स्वतःभोवती पोकळी असल्याचे जाणवले आणि निर्विचार अवस्था अनुभवायला मिळाली.’ – प्रा. महावीर
२ आ २ आ २. पाकीट हातात घेतल्यावर
अ. ‘आम्हाला स्थिरता जाणवली.’ – सौ. वेदश्री आणि कु. मानसी
आ. ‘माझ्या हाताला थंड संवेदना जाणवल्या.’ – श्री. केरकर
इ. ‘आमचा नामजप चालू झाला.’ – सर्वश्री भूषण, उमेश, विक्रम, संतोष, सौ. स्नेहल, कु. सायली आणि कु. मानसी (प्रत्येक साधकाचा वेगवेगळा नामजप चालू झाला, उदा. ॐ, निर्विचार, श्रीकृष्ण.)
३. २४.५.२०२१ या दिवशीचा अधिक चुका असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ठेवलेले ‘आ’ पाकीट
३ अ. आलेल्या त्रासदायक अनुभूती
३ अ १. आध्यात्मिक त्रास असलेला साधक
३ अ १ अ. पाकिटाकडे पाहिल्यावर : ‘मला माझ्या छातीवर दाब जाणवला.’ – एक साधक (‘साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्याचे उत्तर योग्य आले. नामजपादी उपाय पूर्ण झाल्यानंतर त्याने हा प्रयोग केला होता.’ – संकलक)
३ अ २. आध्यात्मिक त्रास नसलेले साधक
३ अ २ अ. पाकिटाकडे पाहिल्यावर
१. ‘आमचे डोके जड झाले आणि आम्हाला जडपणा जाणवला.’ – श्री. भूषण, सौ. स्नेहल, कु. मानसी आणि श्री. केरकर
२. ‘माझ्या डोक्यावर वाईट शक्तीचे आवरण आल्याचे जाणवले.’ – श्री. भूषण
३. ‘माझ्या डोळ्यांमध्ये उष्णता जाणवली.’ – सौ. वेदश्री
४. ‘माझ्या हृदयाची धडधड वाढली.’ – प्रा. महावीर
५. ‘आम्हाला श्वास घेण्यास त्रास होत होता.’ – श्री. भूषण आणि कु. मानसी
६. ‘आम्हाला आमच्या छातीवर दाब जाणवला.’ – कु. सायली, सौ. समीक्षा, सौ. स्नेहल, सौ. वेदश्री आणि श्री. केरकर
७. ‘मला ‘पाकिटावर पुष्कळ त्रासदायक आवरण आले आहे’, असे जाणवले.’ – कु. सायली
८. ‘आम्हाला प्रयत्नपूर्वक नामजप करावा लागला.’ – प्रा. महावीर आणि श्री. भूषण
३ अ २ आ. पाकीट हातात घेतल्यावर
१. ‘आम्हाला अस्वस्थता जाणवली.’ – कु. सायली आणि सौ. समीक्षा
२. ‘मला ‘हातात काहीतरी त्रासदायक जात आहे’, असे वाटले. मला पाकिटाचे वजन अधिक असल्याचे जाणवले.’ – श्री. विक्रम
३ आ. आलेल्या चांगल्या अनुभूती
३ आ १. आध्यात्मिक त्रास नसलेले साधक
३ आ १ अ. पाकिटाकडे पाहिल्यावर
१. ‘माझा नामजप गतीने होऊ लागला.’ – कु. सायली
२. ‘माझा नामजप चालू झाला आणि मला शांत वाटले.’ – श्री. प्रशांत
३. ‘मला ‘पाकिटातून चांगली शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.’ – श्री. उमेश
४. ‘अ’ आणि ‘आ’ या दोन्ही पाकिटांच्या संदर्भात जाणवलेली तुलनात्मक सूत्रे
४ अ. आध्यात्मिक त्रास नसलेले साधक
४ अ १. पाकिटांकडे पाहिल्यावर : ‘मला ‘आ’ पाकिटाच्या तुलनेत ‘अ’ पाकिटावर त्रासदायक शक्तीचे आवरण अल्प आहे’, असे जाणवले.’ – कु. सायली
४ आ २. पाकिटे हातांत घेतल्यावर : ‘आम्हाला ‘आ’ पाकिटाच्या तुलनेत ‘अ’ पाकीट हलके वाटले.’ – श्री. केरकर, कु. मानसी आणि श्री. विक्रम
दैनिक ‘सनातन प्रभात’ला संतांचे आशीर्वाद लाभले असल्यामुळे त्यात मुळातच चैतन्य आहे. त्यामुळे काही साधकांना दैनिकामधील व्याकरण, तसेच शुद्धलेखन यांसंदर्भात झालेल्या चुकांमुळे त्रास जाणवला असला, तरी त्यातील मूलभूत चैतन्यामुळे चांगलेही वाटले. असे जरी असले, तरी कोणत्याही स्वरूपाच्या चुकांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्य न्यून होऊ न देणे आवश्यक आहे. यासाठी अभ्यास म्हणून हा प्रयोग करून घेण्यात आला.
‘सेवेत चुकांचे प्रमाण अधिक असल्यास रज-तम वाढून सात्त्विकता घटते. याउलट चुका अल्प असल्यास सात्त्विकता आणि चैतन्य जाणवते’, या सिद्धांतानुसार चुकांचे प्रमाण अधिक असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक असलेल्या पाकिटाकडे पाहून साधकांना त्रासदायक जाणवले, तर चुका अल्प असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक असलेल्या पाकिटाकडे पाहून बर्याच साधकांना चांगले वाटले आणि अनुभूतीही आल्या.’
– श्री. भूषण केरकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह. (१४.९.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. |