सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्या ‘श्री वाराहीदेवी’च्या यज्ञाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी ‘श्री वाराहीदेवीचा यज्ञ’ केला. या यज्ञाचे देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.
१. श्री वाराहीदेवीची निर्मिती
श्रीविष्णूच्या ‘वराह’ या तिसर्या अवताराच्या शक्तीने जेव्हा सगुण रूप धारण केले, तेव्हा ‘श्री वाराहीदेवीची’ निर्मिती झाली. वाराहीदेवीतील विष्णुतत्त्वामुळे तिची कांती निळसर आहे. ती वराहदेवाची शक्ती असल्यामुळे तिचे रूप वराहाप्रमाणे आहे.
२. श्री वाराहीदेवीची वैशिष्ट्ये
श्री वाराहीदेवी हा भूदेवीचा अवतार आहे. तिच्यामध्ये श्रीविष्णूची शक्ती आहे. तिच्या उपासनेमुळे आध्यात्मिक बळ प्राप्त होऊन विविध सिद्धी मिळतात.
३. श्री वाराहीदेवीसाठी यज्ञ करण्यामागील उद्देश
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी सनातनच्या रामनाथी आश्रमात सलग ३ दिवस ‘श्री वाराही यज्ञ’ करण्यात आला. श्री वाराहीदेवीकडून प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग दूर झाला. त्याचप्रमाणे श्री वाराहीदेवीकडून प्रक्षेपित होणार्या तारक शक्तीमुळे पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यापूर्वी संपूर्ण पृथ्वीवर हिंदु धर्म आणि अध्यात्मशास्त्र यांचा प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला भूमी मिळून या भूमीमध्ये आश्रमाची निर्मिती करून त्या आश्रमामध्ये हिंदु धर्म आणि अध्यात्म यांच्याशी संबंधित संशोधन कार्य होणे आवश्यक आहे. यासाठी श्री वाराहीदेवीच्या कृपेने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला’ भूमी मिळणार आहे.
४. श्री वाराहीदेवीच्या उपासनेमुळे होणारे लाभ
अ. भूसंपादन करण्यातील अडथळे दूर होतील.
आ. भूमीचे उंदीर आणि सापासारखे विषारी प्राणी यांच्यापासून रक्षण होईल.
इ. तिच्या कृपेने भूमीमध्ये पाण्याचा साठा सापडेल.
ई. भूमी सात्त्विक होऊन भूमीचा उपयोग सात्त्विक कर्म किंवा धार्मिक कार्य करण्यासाठी केला जाईल.
उ. भूमीचे पंचमहाभूतांच्या प्रकोपासून रक्षण होईल.
५. श्री वाराहीदेवीसाठी केलेल्या हवनात वाळा आणि गुळवेल यांच्या समिधांची आहुती दिल्यावर झालेला परिणाम
५ अ. वाळ्याची आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम : वाळ्यामध्ये दत्ततत्त्व कार्यरत असते. श्री वाराहीदेवीसाठी वाळ्याची आहुती दिल्यानंतर देवीसह दत्ततत्त्व कार्यरत झाले. दत्ततत्त्वयुक्त वाराहीदेवीची शक्ती साधकांच्या स्वाधिष्ठान चक्राकडे आकृष्ट झाली. त्यामुळे साधकांना पचनसंस्थेशी संबंधित असणार्या व्याधींचे प्रमाण न्यून झाले.
५ आ. गुळवेलीच्या समिधांची आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम : गुळवेलीला ‘अमृतवेल’ही म्हणतात. श्री वाराहीदेवीसाठी गुळवेलीच्या समिधांची आहुती दिल्यावर धन्वन्तरि देवतेचे तत्त्व श्री वाराहीदेवीच्या तत्त्वासह कार्यरत झाले. या संयुक्त तत्त्वांनी युक्त असणार्या सुगंधमय लहरी वायूमंडलात पसरल्या आणि त्यानंतर त्या श्वासावाटे साधकांच्या देहात गेल्या. त्यामुळे साधकांच्या देहातील विविध रोगांचे जंतू नष्ट होऊन साधकांच्या भोवती गंधमय लहरींचे संरक्षककवच निर्माण झाले.
६. श्री वाराहीदेवीसाठी यज्ञ करत असतांना श्रीविष्णूच्या ‘वराह’ अवताराची शक्ती कार्यरत होणे
श्री वाराहीदेवीसाठी यज्ञ करत असतांना श्रीविष्णूच्या ‘वराह’ अवताराची शक्ती कार्यरत झाली. वराह अवताराने पाताळातून पृथ्वीकडे येणार्या वाईट शक्तींच्या प्रवाहाला रोखण्यासाठी त्यांच्याशी सूक्ष्म युद्ध केले. त्यामुळे पृथ्वीकडे येणारा वाईट शक्तींचा मोठा प्रवाह दूर झाला. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट दूर झाले.
७. श्री वाराहीदेवीची शक्ती पंचमहाभूतांच्या स्तरावर कार्यरत झाल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
८. श्री वाराहीदेवीच्या चरणांचा पावन स्पर्श भूमीला झाल्यामुळे पृथ्वीवर भरभराट होणार असणे
यज्ञस्थळी सूक्ष्मातून श्री वाराहीदेवीचे अस्तित्व जाणवत होते. तिच्या चरणांचा पावन स्पर्श भूमीला होत होता. त्यामुळे तिच्या चरणांतून प्रक्षेपित झालेली मारक शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरी भूमीमध्ये जाऊन भूमीमध्ये साठलेल्या त्रासदायक शक्तीचे विघटन होऊ लागले. अशा प्रकारे भूमीला श्री वाराहीदेवीच्या चरणांचा स्पर्श झाल्याने संपूर्ण भूमीची शुद्धी झाली. भूमीची सात्त्विकता वाढल्यामुळे वनप्रदेशांचे जतन होणार आहे आणि भूमीमध्ये सात्त्विक वनस्पती उगवण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्याचप्रमाणे भारतातील शेतांमध्ये भरघोस पीक येऊन पृथ्वी समृद्ध होऊन भरभराट होणार आहे.
९. श्री वाराहीदेवीने वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करून त्यांचा नाश करणे
पृथ्वीवर रहाणारे हिंदुत्वनिष्ठ, साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पाताळातून आक्रमणे करणार्या मायावी वाईट शक्तींशी श्री वाराहीदेवीने घनघोर युद्ध करून त्यांचा नाश केला. त्याचप्रमाणे तिने शंखनाद करून वाईट शक्तींना भयभीत केले आणि सुदर्शनचक्र सोडून त्यांचा विनाश केला.
१०. यज्ञाच्या वेळी श्री वाराहीदेवीची प्रकट शक्ती कार्यरत असणे आणि यज्ञानंतर ती अप्रकट होणे
यज्ञाच्या वेळी श्री वाराहीदेवीची प्रगट शक्ती पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली होती. त्यामुळे हळदीचा दैवी सुगंध दरवळत होता आणि देवीची शक्ती न पेलवल्यामुळे माझे डोके जड झाले होते. यज्ञ संपल्यानंतर देवीची शक्ती अप्रकट झाल्यामुळे माझ्या डोक्याला जाणवणारा जडपणा न्यून झाला आणि आनंदात वृद्धी झाली.
११. श्री वाराहीदेवीच्या तत्त्वाची पंचमहाभूतांच्या स्तरांवर येणारी अनुभूती
१२. विविध युगांमध्ये श्री वाराहीदेवीची कार्यरत असणारी शक्ती आणि धर्मसंस्थापनेच्या कार्यातील सहभागाचे प्रमाण
टीप : कलियुगात धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी प्रामुख्याने श्री दुर्गादेवीचे रूप असणार्या श्री भवानीदेवीची शक्ती कार्यरत असल्यामुळे श्री वाराहीदेवीची शक्ती अल्प प्रमाणात कार्यरत झाली आहे.
१३. कृतज्ञता
‘भगवंताच्या कृपेमुळे सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये श्री वाराहीदेवीचे तत्त्व यज्ञाच्या रूपाने कार्यरत झाले आणि ते अनुभवण्याची संधी मिळाली’, यासाठी भगवंताच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
(महर्षींचे आज्ञापालन म्हणून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ नाडीपट्टीनुसार सांगितलेल्या यज्ञांच्या हवनामध्ये सहभागी होतात. – संकलक)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |