अमेरिका तालिबानशी चर्चा करणार
वॉशिंग्टन (अमेरिका) – अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिका आता तालिबानसमवेत प्रथमच चर्चा करणार आहे. ‘कतारची राजधानी दोहा येथे दोन दिवस ही चर्चा होणार आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या चर्चेमध्ये अफगाणिस्तानमधील अमेरिकी नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अमेरिका तालिबानवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. यासह महिलांचे अधिकार आणि करार यांनुसार, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर देशांविरुद्ध करू न देण्याच्या सूत्रावरही तालिबानवर दबाव टाकला जाणार आहे. या बैठकीत तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याच्या सुत्रावर चर्चा होणार नाही. तालिबान सरकारला मान्यता, ही त्यांच्या कामाच्या आधारेच मिळणार असल्याचे अमेरिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
US to hold first face-to-face talks with Taliban since Afghanistan withdrawal https://t.co/0t6Mq6B4iA
— Hindustan Times (@HindustanTimes) October 9, 2021