एटा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून मंदिराच्या पुजार्याची हत्या !
अन्य राज्यांच्या तुलनेत भाजपचे राज्य असणार्या उत्तरप्रदेशमध्ये मंदिरांचे पुजारी, साधू, महंत आदींच्या सातत्याने होणार्या हत्या हिंदूंना अपेक्षित नाहीत ! – संपादक
एटा (उत्तरप्रदेश) – येथील नगला जगरूप गावामधील मंदिरातील ५२ वर्षीय पुजारी कृपाल सिंह यांची कुर्हाडीद्वारे हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी रज्जाक नावाच्या तरुणाला अटक केली आहे. पुजारी कृपाल सिंह एक मासांपूर्वी या मंदिरात पुजारी म्हणून रहाण्यास आले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रज्जाक आणि कृपाल सिंह यांचे संबंध चांगले होते. ते एकत्र भोजनही करत असत. घटनेपूर्वीही या दोघांनी एकत्र भोजन केल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर रज्जाक नशेच्या स्थितीत पोलिसांना येथे आढळून आला.
Uttar Pradesh: Temple priest found brutally murdered, Etah police arrests one Razzak, recovers an axe used for the crimehttps://t.co/kI7k7ItN3w
— OpIndia.com (@OpIndia_com) October 9, 2021