कर्नाटकच्या कटीलू आणि पोळली येथील देवीच्या मंदिरांत येण्यासाठी भाविकांना पारंपरिक पोशाख बंधनकारक !
सरकारी संस्था ‘कर्नाटक धार्मिक परिषदे’ने दिला होता सल्ला !
|
मंगळुरू (कर्नाटक) – मंदिरासंबंधी धार्मिक विधी आणि परंपरा यांविषयी शासनाला सल्ला देणारी सरकारी संस्था ‘कर्नाटक धार्मिक परिषद’ हिच्या सूचनेनुसार मंगळुरूजवळ असलेल्या कटीलू येथील दुर्गापरमेश्वरी मंदिर अन् पोळली येथील राजराजेश्वरी मंदिर या मंदिरांत प्रवेश करतांना भाविकांना पारंपरिक पोषाख घालणे सक्तीचे करण्यात आले आहे.
१. कटीलू येथील दुर्गापरमेश्वरी मंदिराजवळ ‘भाविकांनी पारंपरिक हिंदु वेशात मंदिरात प्रवेश करावा’, असा फलक लावण्यात आला आहे. यासंबंधी कर्नाटक धार्मिक परिषदेचे म्हणणे आहे, ‘मंदिर ही पवित्र जागा आहे. त्यामुळे येथे भक्ती करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. याविषयी जागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.’’
२. ‘मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘ड्रेस कोड’ (पेहरावाचे नियम) ठेवावा’, अशी मागणी करण्यासाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी पदयात्रा आयोजित केली होती. ‘पुरुष आणि महिला भाविकांनी पारंपरिक वेशात मंदिरात जावे’, अशा आशयाची भित्तीपत्रके मंदिराच्या परिसरात काही ठिकाणी लावण्यात आली आहेत.
४. कर्नाटक धार्मिक परिषदेच्या ‘ड्रेस कोड’संबंधी निर्णयाला सामाजिक माध्यमांवरून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ‘मंदिरे ‘फॅशन’ (तोकडे कपडे आदी प्रकारचा आधुनिक पद्धतीचा पेहराव) करण्याची ठिकाणे झाली आहेत’, अशा परिषदेच्या निर्णयाच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया होत्या. याउलट काही जणांनी या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
५. कोणत्याही टीकेने विचलित न होता राज्यातील २१६ ‘अ’ श्रेणीतील मंदिरांमध्ये ‘ड्रेस कोड’ लागू करण्याविषयीच्या निर्णयावर परिषद ठाम आहे.