धाड टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक !
आयकर विभागाने केलेल्या धाडसत्राच्या संदर्भात शरद पवार यांची प्रतिक्रिया !
बारामती – एखाद्या विषयाच्या संदर्भात शंका असतील, तर त्यासंबंधी चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे; मात्र अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरी आणि आस्थापनांवर धाडी टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ते बारामती येथील गोविंदबाग येथे पत्रकारांशी बोलत होते. धाडसत्राच्या संदर्भातील चौकशी सध्या चालू असून या चौकशीनंतर सविस्तर बोलता येईल, असेही पवार यांनी सांगितले. उत्तरप्रदेश मधील शेतकर्यांच्या अंगावर वाहन घातलेल्या प्रकाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्याने त्याचा सत्ताधार्यांना राग आला असावा आणि ही कारवाई त्यावरील प्रतिक्रिया असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पवार यांनी म्हटले.