अमली पदार्थविरोधी पथकाकडून गोव्यात वर्षभरात १२ मुख्य अमली पदार्थ व्यवहारांवर कारवाई !
असे असले, तरी अमली पदार्थ प्रकरणांशी निगडित कायदा कठोर होत नाही, तोपर्यंत जामिनावर सुटलेले या प्रकरणांतील गुन्हेगार पुन्हा व्यवसाय करणार ! त्यामुळे पोलिसांची कारवाई हा अमली पदार्थ व्यवहार रोखण्यातील वरवरचाच उपाय ठरतो !
पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई आणि गोवा विभाग यांनी संयुक्तपणे गोव्यातील १२ मुख्य अमली पदार्थ व्यवहारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘अमली पदार्थविरोधी पथकाने चालू वर्षी मुंबई येथे ९४, तर गोवा येथे १२ प्रकरणे नोंद केली. या प्रकरणात ३०० अमली पदार्थ व्यावसायिक आणि अमली पदार्थाचा पुरवठा करणारे यांना कह्यात घेण्यात आले. १२ मुख्य अमली पदार्थ व्यवहारांवर कारवाई करण्यात आली, तर मुंबई आणि गोवा येथील काही अमली पदार्थ व्यवहाराशी निगडित लघु प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्यात आल्या.’’