संभाजीनगर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मधुकर देशमुख (वय ७५ वर्षे) आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा देशमुख (वय ७० वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. मधुकर देशमुख

‘श्री. मधुकर आणि सौ. शोभा देशमुख यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. त्या दोघांचे तोंडवळे माझ्या डोळ्यांसमोर आले अन् माझी भावजागृती झाली. ‘देवाने दोघांना एकाच वेळी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले’, यापेक्षा त्यांच्या जीवनातील मोठा भाग्याचा क्षण कोणता असू शकतो ?’, असे मला वाटले. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सेवेची तळमळ

सौ. शोभा देशमुख

श्री. मधुकर आणि सौ. शोभा देशमुख यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अन् समष्टी सेवेची तळमळ वाखाणण्यासारखी आहे. दोघांचे वय पहाता ते पुष्कळच समष्टी सेवा करतात. ‘देव शक्ती देऊन त्यांच्याकडून सेवा करवून घेत आहे’, असे मला वाटते. ते बुलढाणा येथे त्यांच्या मुलीकडे एक मास रहाण्यासाठी आले होते. येथे आल्यावरही त्यांची सेवा चालूच होती. बुलढाणा येथे लोकांना सनातन संस्थेविषयी अधिक माहिती नाही, तरीही ते तळमळीने सेवा करत होते. ‘घरोघरी जाऊन धर्मप्रसार करणे, सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे वितरण करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, ग्रंथप्रदर्शन लावणे’, या सर्व सेवांत ते सहभागी झाले होते.

२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

सौ. आशा वट्टमवार

ते दोघेही व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे देतात. ते त्यांच्या साधनेतील अडचणी विचारून त्यांचे निरसन करून घेतात. त्या दोघांमध्ये घडलेले प्रसंगही ते मनमोकळेपणाने सांगतात आणि त्यावर उपाययोजना म्हणून स्वयंसूचना सत्रे करतात.’

– सौ. आशा वट्टमवार, बुलढाणा (३.५.२०१९)


देवाने दिला मोक्ष जीवनी ।
आजच्या या मंगलदिनी ।
देवाने दिला आनंद जीवनी ।। १ ।।

मोक्षाला जाण्यासाठी ।
देवाने घेतली सेवा करवूनी ।। २ ।।

सेवेचा ध्यास लावूनी ।
दिला मोक्ष जीवनी ।। ३ ।।

(श्री. मधुकर आणि सौ. शोभा देशमुख यांची ६१ टक्के पातळी घोषित झाल्यावर सुचलेली कविता)

– सौ. आशा वट्टमवार, बुलढाणा (३.५.२०१९)