श्री भवानीदेवीचा जप करतांना साधकाचे मानेपासून डोके हालणे आणि सहस्रारचक्रावर सहस्र पाकळ्यांचे कमळ फुललेले दिसणे
‘२०.१०.२०२० या दिवशी सकाळी माझा श्री भवानीदेवीचा नामजप चालू होता. (सनातनचे सर्व साधक प्रतिदिन सकाळी ९.३० ते १० या कालावधीत श्रीविष्णु, श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी या देवतांचा नामजप करायचे. – संकलक) यापूर्वी नामजपाच्या वेळी माझे ध्यान लागतांना कमरेपासून वरील शरीर मागे-पुढे आंदोलित होत (हालत) असे. आज नामजपाच्या वेळी ‘माझ्या शरिराची आंदोलने न होता केवळ मानेपासून डोके हालत होते. त्या वेळी मला डोक्यावर सहस्रारचक्रापाशी सहस्र पाकळ्यांचे कमळ फुललेले दिसले. हे कमळ फिकट निळसर आणि फिकट लाल मिश्रित रंगांचे होते.’ ध्यानातून बाहेर आल्यावर नेहमीप्रमाणे माझ्या शरिराची आंदोलने आणि कमळाचे दर्शन होणे बंद झाले.’ – श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२०.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |