‘ते’ येथे पैसे कमवतात आणि पाकिस्तानला पाठवतात !
भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांची अभिनेते शाहरुख खान यांच्यावर टीका
असे जे कुणी आहेत, त्यांच्यावर सरकार कठोर कारवाई का करत नाही ? अशांवर कारवाई होण्यासाठी साध्वींनीही प्रयत्न केले पाहिजे ! – संपादक
भोपाळ (मध्यप्रदेश) – जेव्हा केव्हा ‘त्याने’ (अभिनेते शाहरुख खान यांनी) साहाय्य केले आहे, ते पाकिस्तानलाच केले आहे. भारताला कधीही साहाय्य केले नाही. ते येथे कमावतात; पण पाठवतात पाकिस्तानला. त्यांचे वास्तव समोर येत आहे. जे शिल्लक आहे ते सुद्धा लवकरच बाहेर येईल. आता देशभक्तांची आवश्यकता आहे. केवळ देशभक्तच येथे रहातील, अशी टीका भाजपच्या येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी अभिनेते शाहरुख खान यांचे नाव न घेता केली. शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान अमली पदार्थांच्या प्रकरणी अटकेत आहे. त्यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी एका व्हिडिओद्वारे हे विधान केले आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर क्रूज रेव पार्टी में आर्यन खान के पकड़े जाने के बाद अभिनेता शाहरुख खान पर तीखा हमला बोला #MadhyaPradesh #DrugCase
(@ReporterRavish) https://t.co/5qUDytICay— AajTak (@aajtak) October 7, 2021
साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुढे म्हटले आहे की,
१. आपल्या देशात रहाणारे हे लोक (शाहरुख खान यांच्यासारखे) म्हणायचे ‘आम्ही भारतात सुरक्षित नाहीत.’
२. चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी अधिक पैसे कमावले आहेत आणि जे लोक ते पैसे चांगल्या कामात गुंतवत नाहीत, अशांची मुले अशा प्रकारची कामे करतात.