ओडिशामध्ये हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकाला गावात येण्यास बंदी !

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंची कौतुकास्पद कृती ! हिंदु समाज सतर्क झाला, तर ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव हाणून पाडणे शक्य आहे, हे जाणा ! – संपादक

ख्रिस्ती धर्मप्रसारक महेंद्र साहू

सुंदरगढ (ओडिशा) – येथील तंगरदीही गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकाला गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती धर्मप्रचारकाचा डाव हाणून पाडण्यासाठी गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वारंवार विरोध करूनही हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी महेंद्र साहू नामक ख्रिस्ती धर्मप्रसारक तंगरदीही गावात सातत्याने येत होता. (धर्मांतर केलेल हिंदू त्यांचे हिंदु नाव पालटत नाहीत. अन्य हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना हिंदु समाजात सुलभतेने वावरता यावे, हा त्यांचा उद्देश असतो ! – संपादक) हे लक्षात आल्यावर हिंदु ग्रामस्थांनी गावकर्‍यांची बैठक बोलावली. त्यात साहू याच्याकडून ‘मी पुन्हा गावात येणार नाही’ अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रच त्याच्याकडून लिहून घेतले. हिंदूंच्या धर्मांतरासाठी सुंदरगढ जिल्हा कायमच ख्रिस्ती मिशनर्‍यांचे लक्ष्य राहिला आहे. ‘राज्यात धर्मांतर विरोधी कायदा असूनही राज्य सरकारकडून त्याची योग्य कार्यवाही होत नाही’, असे विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा सचिव रामचंद्र नाईक यांनी म्हटले आहे. (धर्मांतरबंदी कायदा असतांना ख्रिस्ती धर्मप्रसारक हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करतात, याचा अर्थ त्यांना कायद्याचा भय राहिलेला नाही, हेच लक्षात येते ! या कायद्याची प्रभावी कार्यवाही न करणारे बिजू जनता दल सरकार यास उत्तरदायी आहे ! – संपादक)