मगोप प्रादेशिक पक्षांशी युती करण्यासाठी सिद्ध ! – सुदिन ढवळीकर, आमदार
पणजी, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – मगो पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युती करण्यासाठी ‘आप’शी अनेक वेळा चर्चा केली; मात्र या चर्चांना पुढे यश आले नाही. मगो पक्ष प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांच्याशी युती करण्यासाठी सिद्ध आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष १८ जागांवर स्वबळाने निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी दिली.
आमदार श्री. सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘मगो पक्षाने आतापर्यंत १२ उमदेवार निश्चित केलेले आहेत आणि या उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघात काम करण्यास प्रारंभ केला आहे.’’