परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या लिखाणातील एक चूक दाखवून वाक्यात केलेली सुधारणा

साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एकदा परात्पर गुरु डॉक्टर संगणकावर साधकांना आलेल्या अनुभूती पडताळत होते. एका अनुभूतीत पुढील वाक्य होते, ‘आपण चुकतो, तरी भगवंत आपल्या पाठीशी उभा रहातो. तो आपली चूक पदरात घेतो.’ हे वाक्य वाचल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यातील गंमत सांगितली. ते म्हणाले, ‘‘भगवंताला पदर असतो का ?’’ नंतर परात्पर गुरुदेवांनी वाक्यात पुढील सुधारणा केली, ‘आपण चुकतो, तरी भगवंत आपल्या पाठीशी उभा रहातो. आपल्या चुकीला क्षमा करतो.’ – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२०)