८ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (दुसरा दिवस)
नवरात्रोत्सव (आज दुसरा दिवस)
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
यथा शुम्भो हतो दैत्यो निशुम्भश्च महासुरः ।
वैरिनाशाय वन्दे तां कालिकां शङ्करप्रियाम् ।।
अर्थ : जिने शुम्भ-निशुम्भासारख्या महादैत्यांचा वध केला त्या शिवाला प्रिय असलेल्या कालिकादेवीला शत्रूनाशासाठी मी प्रार्थना करतो.
एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ति’)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका : https://www.sanatan.org/mr/navratri