पुणे पोलीस आयुक्तालयाच्या लेखी परीक्षेत बनावट (डमी) विद्यार्थी बसल्याचे उघडकीस !
पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयाने घेतलेल्या लेखी परीक्षेस बसलेल्या बनावट (डमी) उमेदवाराला पोलिसांनी पकडले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन’ या केंद्रावर पकडलेला बोगस उमेदवार ५ लाख रुपये घेण्याचे ठरवून परीक्षा देण्यासाठी आल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. महेश दांडगे या उमेदवाराच्या जागी विठ्ठल जारवाल हा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आला होता; मात्र कागदपत्र आणि छायाचित्र यांची पडताळणी केली असता तो बनावट असल्याचे लक्षात आले. या व्यवहारासाठी जनक सिसोदे यांनी मध्यस्ती केली होती. त्यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.