भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक राष्ट्रीय कार्यकारी सदस्य
पणजी, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची राष्ट्रीय कार्यकारी सदस्य या नात्याने, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि भाजपचे महासचिव (संघटना) सतीश धोंड यांना निमंत्रित म्हणून नेमण्यात आले आहे. त्याचप्रमाणे समितीमध्ये पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना विशेष निमंत्रित म्हणून नेमण्यात आले आहे.