‘जरंडेश्वर’चा खरा मालक कोण आहे ? – किरीट सोमय्या, भाजप नेते
मुंबई – ‘जरंडेश्वरचा खरा मालक कोण ?’ हे अजित पवारांनी सांगावे. तुम्ही पाप केले, घोटाळे केले तर मान्य करा. साखर कारखान्यांच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक फेब्रुवारीपासून कारागृहात आहे. अजित पवारांनी ही बेनामी मालमत्ता खरेदी केली आहे. अजित पवारांमध्ये धैर्य असेल, तर मुख्य न्यायाधिशांसमोर जाऊन काय ते सांगावे, असे आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
अजित पवारच नव्हे, तर देशातील कुठल्याही निर्दोष व्यक्तीला तपास यंत्रणांनी हैराण करू नये, अशीच आमची भूमिका असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.