नगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आणखी ८ गावांवर निर्बंध !
निर्बंध असलेल्या गावांची संख्या ६९
नगर – जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये दळणवळण बंदीचा आदेश दिल्यानंतर आणखी ८ गावांमध्ये नव्याने हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दळणवळण बंदी लागू केलेल्या गावांची संख्या ६९ झाली आहे. सरकारने योग्य निकष लावावे; अन्यथा आंदोलन करण्याची चेतावणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. पारनेर तालुक्यातील व्यापार्यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन केले. गावात १० रुग्ण आढळल्यास दळणवळण बंदी करण्याचा निर्णय चुकीचा असून त्यामुळे मोठ्या गावांवर अन्याय होत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत किती टक्के रुग्ण संख्या आहे ? हा निकष लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.