रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. ‘श्री भवानीदेवी प्रेमळ दृष्टीने बघत आहे’, असे जाणवणे

सौ. राजश्री आगावणे

‘१६.९.२०१९ या  ‘आई जशी आपल्या मुलाकडे प्रेमळ दृष्टीने बघते, तशी देवी माझ्याकडे बघत आहे’, असे देवीच्या मुखावरील भाव सांगत होते.

२. देवीच्या अंगावर आणि तिचे मुखमंडलही लाल दिसणेअन् परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेमुळे देवीशी सूक्ष्मातून बोलता आल्याबद्दल मन कृतज्ञतेने भरून येणे

१७.९.२०१९ या दिवशी सकाळी मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले होते. तेव्हा देवीच्या अंगावर लाल वस्त्रे दिसली अन् तिचे मुखमंडलही लाल दिसत होते. त्या वेळी मी देवीशी बोलत होते. मी तिला माझी स्थिती सांगत होते. मला परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेमुळे देवीला भेटता आणि तिच्याशी बोलता आले. त्यामुळे माझे मन कृतज्ञतेने भरून आले होते.

३. रामनाथी आश्रमात ४ वर्षांपूर्वी आल्यावर देवीच्या नेत्रांतून मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे आणि या वेळी तिच्या करुणामय दृष्टीमुळे तिच्याकडे कितीही वेळ पाहिले, तरी समाधान न होणे

वर्ष २०१५ मध्ये मी रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी देवीच्या नेत्रांतून मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे जाणवत होते. तेव्हा मी तिच्या नेत्रांकडे पुष्कळ वेळ पाहू शकत नव्हते; परंतु या वेळी तिच्या करुणामय दृष्टीमुळे तिच्याकडे कितीही वेळ पाहिले, तरी मन भरत नव्हते आणि तिच्याशी सहजतेने अनुसंधान साधता येत होते.

४. आरतीच्या वेळी ‘देवीची मूर्ती आणि स्वतःही हालत आहे’, असे जाणवणे

१९.९.२०१९ या दिवशी सकाळी मी आरतीला गेले होते. तेव्हा ‘देवीची मूर्ती हालत आहे’, असे मला जाणवत होते. मी आश्रमात ३ दिवस आरतीला येत होते. तेव्हा मला आरतीला स्थिर उभे राहता येत नव्हते आणि ‘आज मी स्वतः हालत होते’, असे माझ्या लक्षात आले.’ – सौ. राजश्री आगावणे, बार्शी (१८.९.२०१९)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.