कृतज्ञ होऊया परात्पर गुरुदेव अन् भूदेवीच्या चरणी ।
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी लिहिण्यासाठी शब्दच अपुरे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुदेवांनी सुचवलेली शब्दसुमने गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
सर्वांसाठी आनंददायी स्मरण भूदेवीचे (टीप १) ।
सर्वांना देई चैतन्य मोहक रूप भूदेवीचे ।
सर्वांना देई साधनेत उभारी प्रेम भूदेवीचे ।
कृतज्ञ झालो परात्पर गुरुदेव (टीप २) अन् भूदेवीच्या चरणी ।। १ ।।
भावसत्संगात करते उधळण चैतन्याची ।
श्रीगुरुचरणी घेऊनी जाते भावविश्व निर्मूनी ।
अमृतवाणीतून पाजिते ज्ञानामृत सर्वांना दैवी ।
कृतज्ञ झालो परात्पर गुरुदेव अन् भूदेवीच्या चरणी ।। २ ।।
अमृताचा झरा मिळतो भूदेवीच्या वाणीतून ।
चैतन्यशक्ती मिळतसे भूदेवीच्या वाणीतून ।
अखंड प्रेरणा मिळतसे भूदेवीच्या वाणीतून ।
कृतज्ञ झालो परात्पर गुरुदेव अन् भूदेवीच्या चरणी ।। ३ ।।
सर्वांच्या अंतर्मनी पोचते तिची वाणी ।
देते अखंड आनंद अन् शांती तिची वाणी ।
सतत ऐकत रहावी, वाटे तिची वाणी ।
कृतज्ञ झालो परात्पर गुरुदेव अन् भूदेवीच्या चरणी ।। ४ ।।
शिकवते वाढवण्या गुरुचरणी अढळ श्रद्धा ।
शिकवते तारून नेणार आपत्काळात श्रद्धा ।
बिंबवते साधकांच्या मनी वाढवण्या श्रद्धा ।
कृतज्ञ झालो परात्पर गुरुदेव अन् भूदेवीच्या चरणी ।। ५ ।।
होतो स्पर्श अमृतवाणीचा कर्णेंद्रियांना हळूवार ।
उलगडते मनाच्या भावभक्तीचे द्वार हळूवार ।
प्रवेश होतो कोमल गुरुचरणांचा मनात हळूवार ।
कृतज्ञ झालो परात्पर गुरुदेव अन् भूदेवीच्या चरणी ।। ६ ।।
हे परात्पर गुरुदेवा, कशी वर्णू थोरवी श्रीभूदेवीची ।
कृतज्ञ होऊया परात्पर गुरुदेव अन् भूदेवीच्या चरणी ।। ७ ।।
टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले
– वैद्या (कु.) माया आदगौंडा पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.९.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |