पाकिस्तान आतंकवाद पसरवणारा सर्वांत मोठा गुन्हेगार ! – संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा फटकारले
अशा फटकारण्याचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही आणि जागतिक समुदायही पाकच्या विरोधात विशेष काही करत नाही, हे गेल्या ३ दशकांपासून भारत पहात आहे. त्यामुळे पाकला युद्धाद्वारे नष्ट करणे, हाच आतंकवाद नष्ट करण्याचा एकमेव पर्याय आहे, हे भारत कधी लक्षात घेणार आणि त्यानुसार कृती करणार ? – संपादक
न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठाचा दुरुपयोग खोटे पसरवण्यासाठी केला आहे. पाकिस्तान आतंकवाद पसरवणारा सर्वांत मोठा गुन्हेगार आहे; मात्र तो आतंकवादाचा बळी असल्याचे ढोंग करत असतो, अशी टीका भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७६ व्या सत्राच्या ६ व्या समितीमध्ये पाकवर केली. भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट म्हणाल्या की, सर्व सदस्य देशांनी आतंकवादाच्या विरोधातील त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.
India slams Pakistan at #UNGA76, calls it the biggest perpetrator and supporter of terrorism #DeshKaZee https://t.co/7VjZRCJpRs
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 7, 2021