काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून दोघा शीख शिक्षकांची शाळेत घुसून हत्या
२ दिवसांपूर्वीच दोघा हिंदूंच्या हत्या !
|
श्रीनगर – जिहादी आतंकवाद्यांकडून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. सतिंदर कौर शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. गेल्या काही दिवसांपासून आतंकवाद्यांकडून या दोन्ही शिक्षकांवर पाळत ठेवली जात होती, अशीही माहिती समोर आली आहे. नुकतीच जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये दोघा हिंदूंची हत्या केली. ही घटना ताजी असतांनाच वरील घटना घडली आहे.
J&K: Slain Srinagar teachers were segregated, targeted on basis of religion, DGP says ‘civilians targeted to create communal disharmony’ https://t.co/LBwBodhQAz
— OpIndia.com (@OpIndia_com) October 7, 2021
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार २ – ३ सशस्त्र आतंकवादी शाळेत घुसले आणि त्यांनी सतिंदर कौर अन् शिक्षक दीपक चंद यांच्या थेट डोक्यात गोळी झाडली, तसेच अंदाधुंद गोळीबार केला. या वेळी तेथे उपस्थित सर्व जण जीव वाचवण्यासाठी खाली झोपले. गोळीबार करून तिघेही आतंकवादी पसार झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम चालू केली आहे.
(म्हणे) ‘मुसलमानांच्या प्रतिमेचे हनन केले जात आहे !’ – जम्मू-काश्मीचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह
जम्मू – काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले की, अशा प्रकारच्या आक्रमणांद्वारे मुसलमानांच्या प्रतिमेचे हनन केले जात आहे. (जम्मू-काश्मीरमधील मुसलमानांचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलणारे पोलीस ! अशा पोलिसांकडून हिंदूंचे रक्षण होणे कदापि शक्य नाही, यास्तव हिंदु राष्ट्राची स्थापना करा !) लोकांना दाखवण्यात येत आहे की, काश्मीरमध्ये लोक प्रेमाने आणि बंधूभावाने रहात नाहीत. |