मैसुरू (कर्नाटक) मध्ये हिंदुद्वेष्ट्यांकडून ‘महिषा दसर्या’ला प्रारंभ
प्रशासनाने कार्यक्रमाची परवानगी नाकारल्यामुळे आयोजकांना कार्यक्रमस्थळ पालटावे लागले
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच जगत्जननी दुर्गादेवीची उपासना करायची सोडून महिषासुराचा उदोउदो केला जातो. या विकृतीचा वैध मार्गांनी विरोध करण्यासह हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक ! – संपादक
मैसुरू (कर्नाटक) – येथे ५ ऑक्टोबर या दिवशी हिंदुद्वेष्ट्यांकडून महिषासुराची शोभायात्रा काढून ‘महिषा दसर्या’ला प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला बसपाचे नेते आणि माजी महापौर आर्. पुरुषोत्तम उपस्थित होते. चामुंडी टेकडीवर असुरांचा राजा महिषासूर याच्या पुतळ्याजवळ ‘महिषा दसरा’ आयोजित करण्यात आला होता; परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्याने उत्सव समितीने कार्यक्रमाचे स्थळ आंबेडकर पार्कमध्ये हलवले.
या वेळी माजी महापौर आर्. पुरुषोत्तम म्हणाले की, राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला धार्मिक अधिकाराची हमी दिलेली असतांना उपायुक्तांनी आम्हाला चामुंडी टेकडीवर महिषा दसरा साजरा करण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही. आम्ही आशा सोडलेल्या नाहीत. लवकरच कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येईल. आम्हाला आशा आहे की, पुढील सरकार स्वतः महिषा दसरा आयोजित करील. (दिवास्वप्न पहाणारे माजी महापौर आर्. पुरुषोत्तम ! – संपादक)