केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोवा भेटीवर
पणजी, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबर या दिवशी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत. या भेटीच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेर्णा येथील ‘फोरेन्सिक’ प्रयोगशाळेचे उद्घाटन करणार आहेत. देहलीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल ७ ऑक्टोबर या दिवशी गोवा भेटीवर येणार आहेत.