गोवा पोलिसांच्या ‘सायबर’ गुन्हे विभागात पहिली अत्याधुनिक ‘सायबर फॉरेन्सिक’ प्रयोगशाळा कार्यान्वित
पणजी, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – गोवा पोलिसांच्या ‘सायबर’ गुन्हे विभागात गोव्याची पहिली अत्याधुनिक ‘सायबर फॉरेन्सिक’ प्रयोगशाळा अखेर कार्यान्वित झाली आहे. ‘सायबर’ विभागाने नुकताच या अत्याधुनिक प्रयोगशाळेचा वापर करून अमेरिकी नागरिकांना लुटणार्या २ बनावट ‘कॉल सेंटर’वर कारवाई केली होती. या प्रयोगशाळेत एखाद्या गुन्ह्याचे ‘डिजिटल’ अमाणि ‘फॉरेन्सिक’ पृथःकरण करण्याची सोय उपलब्ध आहे, तसेच या प्रयोगशाळेत सर्व तर्हेचे प्रशिक्षण देण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.