सावंतवाडी शहरात आजपासून दुर्गामाता दौडचे आयोजन
७ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार ‘दुर्गामाता दौड’
सावंतवाडी – शहरात यावर्षी देखील शिवप्रेमींकडून घटस्थापना ते विजयादशमी (७ ते १५ ऑक्टोबर) या कालावधीत ‘दुर्गामाता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील उभाबाजार येथील शिवतीर्थावरून सकाळी ६ वाजता ही दौड चालू होणार आहे. या ‘दुर्गामाता दौड’मध्ये शहरातील युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे. या वेळी सुमित नलावडे, शुभम् घावरे, कृष्णा धुळपनवर, स्वप्नील यादव, आकाश खिलारे, एकनाथ जाधव, विनय वाडकर आदी युवक उपस्थित होते.