पुणे येथील सनातन संस्थेच्या साधक विद्यार्थिनीचे सनदी लेखापालच्या परीक्षेत सुयश !
पुणे – येथील सातारा रस्ता केंद्रातील १९ वर्षीय कु. सुहासिनी सुनील कुंभार हिने सनदी लेखापालच्या (सी.ए.) प्रथम सत्रातील परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिने अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करणे, अथर्वशीर्ष ऐकणे, नामजपादी उपाय असे आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न केले. ‘गुरुकृपेमुळे पहिल्या प्रयत्नात आणि अल्प कालावधीत हे यश प्राप्त झाले’, असे मनोगत तिने व्यक्त केले. सुहासिनीच्या आई सौ. सरस्वती कुंभार या सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतात.