भाजपच्या विद्यमान सर्व आमदारांना उमेदवारी मिळणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजपच्या विद्यमान काही आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. भाजपची उमेदवारी देण्याची प्रक्रिया संबंधित आमदारांची लोकांशी असलेली जवळीक आणि भाजपचा अंतर्गत सर्वेक्षण अहवाल यांवर अवलंबून असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील भाजप उमेदवाराच्या नावाची शिफारस करेल, तर केंद्रीय समिती उमेदवारीवर अंतिम निर्णय घेणार आहे.’’