‘कॉर्डेलिया जहाजा’वरील पार्टीत अद्यापपर्यंत १६ जणांना अटक !
मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ‘कॉर्डेलिया जहाजा’वरील पार्टीत धाड टाकल्याच्या प्रकरणात अद्यापपर्यंत १६ जणांना अटक केली आहे, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ५ ऑक्टोबर या दिवशी या गुन्ह्यातील ४ जणांना अटक केली आहे. पार्टी आयोजित करणार्यांमध्ये या ४ जणांचा समावेश होता. ‘क्रिप्टो करन्सी’विषयी (आभासी चलन) पडताळणी चालू आहे. शाहरूखचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात कोठडीत आहे. अनुमती न घेता पार्टी आयोजित केल्याचे उघड झाले आहे.