आम्ही केलेली कारवाई कायद्याला धरूनच !
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे स्पष्टीकरण
मुंबई – आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ‘कॉर्डेलिया क्रूझ’ कारवाईच्या वेळी आम्ही काही अप्रशासकीय नागरिकांचे साहाय्य घेतले. यामध्ये किरण गोसावी, मनीष भानुशाली, आदिल उस्मानी, अर्पणा राणे आदींचा समावेश होता. कारवाई करण्यासाठी अप्रशासकीय व्यक्तींचे साहाय्य घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे आम्ही केलेली कारवाई कायद्याला धरूनच होती, असे स्पष्टीकरण केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ६ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर करण्यात आलेल्या कारवाई भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप केला होता. त्यावर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.