धर्मांतर आणि निकाह यांसाठी १० वीच्या विद्यार्थ्याला ‘ब्लॅकमेल’ करणार्या युवतीला मथुरेतून अटक
|
मथुरा (उत्तरप्रदेश) – देहलीच्या मंगोलपुरी येथे रहाणार्या धर्मांध युवतीने १० वीत शिकणार्या एका विद्यार्थ्याशी मैत्री केली. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याला स्वत:समवेत गुरुग्राम येथे नेले. तेथे शीतपेयातून मादक पदार्थ पाजून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याची अश्लील चित्रफीत बनवली. त्या माध्यमातून धर्मांतर आणि निकाह करण्यासाठी त्याला ‘ब्लॅकमेल’ करण्यासही चालू केले. याप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी युवतीला अटक केली असून तिच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तिच्या सहकार्यांचे अन्वेषण चालू आहे.
पोलीस अधीक्षक श्रीशचंद यांनी सांगितले की, देहलीच्या मंगोलपुरी भागामध्ये रहाणार्या एका युवतीने आधी कोसीकलां क्षेत्रातील एका गावातील १० वीच्या विद्यार्थ्याशी सामाजिक माध्यमावर मैत्री केली होती. स्वत:ला हिंदु असल्याचे सांगणार्या युवतीवर आरोप आहे की, तिने संबंधित पीडित हा बेशुद्ध झाल्यावर तिने तिच्या सहकार्यांच्या साहाय्याने विद्यार्थ्याची अश्लील चित्रफीत बनवली. शुद्धीवर आल्यानंतर आरोपींना न सांगता पीडित घरी परत आला. मुलाने संपूर्ण घटना त्याच्या कुटुंबाला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. गौरव ग्रोवर यांच्या आदेशाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून कारवाई चालू करण्यात आली आहे. आरोपी युवतीला निकाहची चर्चा करण्याच्या निमित्ताने मथुरा येथे बोलावण्यात आले. त्यानंतर २ ऑक्टोबर या दिवशी तिला अटक करण्यात आली.