काबुल (अफगाणिस्तान) येथील गुरुद्वारामध्ये तालिबान्यांकडून तोडफोड

काही जणांना कह्यात घेऊन समवेत नेले !

  • विश्‍वासघातकी तालिबानी ! ‘अफगाणिस्तानमधील शिखांची आणि त्यांच्या गुरुद्वारांची कोणतीही हानी करणार नाही अन् होऊही देणार नाही. शिखांनी अफगाणिस्तान सोडू नये’, असे सांगणार्‍या तालिबान्यांची ही कृती ते विश्‍वासार्ह नाहीत, हे दर्शवणारी आहे. भारतातील तालिबानीप्रेमी याविषयी का बोलत नाहीत ? आता ते गप्प का आहेत ? – संपादक
  • पाकच्या जोरावर उड्या मारणारे खलिस्तानी याविषयी का गप्प आहेत ? – संपादक
गुरुद्वारामध्ये तालिबान्यांकडून केलेली तोडफोड

काबुल (अफगाणिस्तान) – सशस्त्र तालिबानी आतंकवाद्यांनी येथील एका गुरुद्वारामध्ये प्रवेश करून तेथे तोडफोड केली. तसेच काही जणांना कह्यात घेऊन समवेत नेले. या आतंकवाद्यांनी गुरुद्वारामधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. या गुरुद्वारामध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी भेट दिली होती. याविषयी ‘इंडियन वर्ल्ड फोरम’चे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी माहिती दिली. चंडोक यांनी म्हटले आहे की, तालिबान्यांनी आमच्या पवित्र स्थानाचा अवमान केला आहे. पंतप्रधान मोदी आणि भारताचे परराष्ट्र मंत्रालय यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.