७ ऑक्टोबरपासून नगर येथील साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार !
शिर्डी (नगर), ६ ऑक्टोबर – राज्यशासनाने ७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक कस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात प्रतिदिन १५ सहस्र साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिाया, ६५ वर्र्षांवरील आणि आजारी व्यक्ती तसेच मास्क न वापरणार्या साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
१० सहस्र ऑनलाईन पास (५ सहस्र सशुल्क आणि ५ सहस्र निशुल्क) असणार आहेत. ग्रामस्थांना मतदान ओळखपत्र आणि आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. यांसह सर्व भक्तांना कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.