अलीगड (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयात भरती असलेल्या विकलांग युवतीवर धर्मांधाकडून बलात्कार !
वासनांध धर्मांध ! अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे ‘जेएन् वैद्यकीय महाविद्यालया’त उपचार घेत असलेल्या एका विकलांग युवतीवर वारिस नावाच्या धर्माधाने बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी वारिस याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी अपघात झाल्यामुळे ‘जेएन् वैद्यकीय महाविद्यालया’त पीडितेला भरती करण्यात आले होते. ३० सप्टेंबरच्या रात्री १२.३० वाजता पीडिता (वय २२ वर्षे) बेपत्ता झाल्याचे दिसले. त्यामुळे डॉक्टरांनी सुरक्षा रक्षक सरताज अली आणि महंमद नदीम यांना पीडितेचा शोध घेण्यास सांगितले. सुरक्षा रक्षक पीडितेचा शोध घेत असतांना त्यांना रुग्णालयाच्या स्नानगृहातून पीडितेच्या ओरडण्याचा आवाज आला. तेथे वारिस युवतीवर बलात्कार करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपीला पकडून पोलिसांकडे देण्यात आले. वारिस हा रुग्णालयाच्या समोर असलेल्या एका औषधाच्या दुकानात काम करतो.