श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना आलेल्या अनुभूती
१. अनुभूती
१ अ. खोलीची स्वच्छता करतांना आनंद आणि उत्साह जाणवणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना मला वेगळाच आनंद अनुभवता येतो. त्या वेळी ‘त्या खोलीत उपस्थित असून मला सेवा सांगत आहेत,’ असे मला सूक्ष्मातून जाणवते. त्यामुळे खोली स्वच्छता करतांना मला आनंद आणि उत्साह जाणवतो.
१ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना मला खोलीत सुगंध येतो आणि पांढरा प्रकाश दिसतो.
१ इ. माझ्या मनात कधी नकारात्मक विचार असल्यास श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना बघितल्यावर माझ्या मनातील सर्व विचार दूर होऊन मन सकारात्मक आणि आनंदी होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची अनुभवलेली प्रीती
एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना त्यांच्या पादत्राणांना खिळा असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘तो खिळा आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा असणार’, असे मी गृहीत धरले. काही दिवसांनी तो खिळा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना टोचला. संतांना तो खिळा दाखवल्यावर त्यांनी ‘खिळ्याच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण झाले होते’, असे सांगितले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला विचारले, ‘‘तुम्हाला खिळा टोचला नाही ना ?’’ ‘त्या आमच्या चुकांकडे न बघता आमची काळजीच घेत होत्या’, हे माझ्या लक्षात आले. या प्रसंगातून केवळ आणि केवळ त्यांची प्रीती अनुभवता आली. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, माझ्या गृहीत धरण्यामुळे तुम्हाला त्रास झाला’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कान पकडून क्षमायाचना करतो.
हे परात्पर गुरुमाऊली, तुम्हीच आम्हाला अशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिल्या आणि आम्हाला साधनेत वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन करून साहाय्य केले. आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– कु. हर्ष गोसावी (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१.७.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीच हिंदु राष्ट्र्राचा ध्वज स्थापन करण्यासाठी जात आहे’, असे जाणवून भाव जागृत होणे
श्री भवानीदेवीच्या मंदिरावर ध्वज स्थापन करायचा होता. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्री भवानीदेवीच्या मंदिरात गेल्या. तेव्हा मला एक क्षण रामराज्याची आठवण होऊन ‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी हिंदु राष्ट्र्राचा ध्वज स्थापन करण्यासाठी जात आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. – कु. हर्ष गोसावी