श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेसंदर्भात सांगितलेले दृष्टीकोन यजमानांकडून ऐकतांना ‘हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून बाहेर पडत असून ते अनंत काळासाठी मार्गदर्शक आहे’, असे जाणवणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संगात सांगत असलेले साधनेचे दृष्टीकोन मला माझे यजमान श्री. अनिरुद्ध यांच्याकडून ऐकायला मिळतात. ९.६.२०२० या दिवशी रात्री ११.४५ वाजता मी प्रार्थना केली, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली सूत्रे माझ्या अंतर्मनापर्यंत जाऊ देत आणि ही सर्व सूत्रे मला कृतज्ञतेने ग्रहण करता येऊ देत.’ ही प्रार्थना करत असतांना मला असे जाणवले, ‘माझे आज्ञाचक्र उघडले असून त्यातून पुष्कळ पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे.’ नंतर ही सूत्रे ऐकतांना आणि समजून घेतांना मला असे वाटत होते की, सत्संगातील हे दृष्टीकोन म्हणजे पुष्कळ मोठे ज्ञान आहे. ही सूत्रे मला शब्दांच्या आणि चैतन्याच्या स्तरावर ग्रहण होत होती. त्या वेळी ‘हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून बाहेर पडले असून पुढे अनंत काळासाठी ही सूत्रे मार्गदर्शक ठरतील’, असे मला वाटत होते.
केवळ गुरुकृपेने मला हे दृष्टीकोन समजून घेण्याची संधी मिळत आहे. यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा. (१४.६.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |