या भवसागरात तरून जाण्या दे आम्हा शक्ती ।
सद्गुरु आई (टीप) म्हणजेच
श्री गुरूंचे दुसरे रूप ।
हा आहे हिंदु राष्ट्र स्थापनेतील
चैतन्यमय झोत ।। १ ।।
श्री गुरूंनी घडवले
या महालक्ष्मीस्वरूप देवीला ।
घडवण्या साधनापथावर
आम्हा पामरांना ।। २ ।।
भावसत्संगातून वहातो
अवनीवर चैतन्यमय झरा ।
श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने वैकुंठात
रोवला रामराज्याचा झेंडा ।। ३ ।।
चुकांची जाणीव आम्हा पामरांना परखडतेने करते ।
कित्येक जन्मांचे जणू पापच तू दूर करते ।
प्रेमाने बोलून सर्वच समष्टीला आपलेसे करते ।। ४ ।।
सर्वांचे दुःख, चिंता दूर होते त्यांच्या केवळ संकल्पाने ।
सर्वांच्या साधनेची घडी बसते आईच्या कृपेने ।। ५ ।।
श्री गुरुराया आम्हाला तू दिला हा अनमोल मोती ।
साधनापथावर चालण्या देतो, तो आम्हाला शक्ती ।
कृतज्ञ आम्ही सारे जीव तव चरणा, केवळ तव चरणा ।। ६ ।।
या भवसागरात तरून जाण्या आई तू दे आम्हा शक्ती ।
हिंदु राष्ट्र स्थापण्या कार्यप्रवण होण्यासाठी वाढव भक्ती ।
हीच आर्त प्रार्थना आम्ही सारे जीव
करतो आई तुझ्या वाढदिनी ।। ७ ।।
टीप – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०२१)