नौदलाच्या अखत्यारित असलेल्या दाबोळी विमानतळावरून येत्या डिसेंबरनंतर विदेशात जाणारी विमाने उडण्यावर बंदी येण्याची शक्यता
पणजी, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – भारतीय सैन्याच्या अखत्यारित असलेल्या दाबोळी (गोवा), पुणे आणि श्रीनगर या विमानतळांवरून येत्या डिसेंबरनंतर विदेशात जाणार्या विमानांच्या उड्डाणावर बंदी येण्याची शक्यता आहे. येत्या डिसेंबरनंतर अशा स्वरूपाच्या विमानतळांना विदेशात जाणार्या विमानांच्या उड्डाणासाठी विमान वाहतूक महासंचालकाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे. विमान वाहतूक महासंचालक आणि विमानोड्डाण मंत्रालय यांनी संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण बंद होऊ नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी केली आहे. पुणे आणि श्रीनगर येथील विमानतळ भारतीय वायू दलाच्या, तर गोव्यातील दाबोळी विमानतळ भारतीय नौदलाच्या अधिपत्याखाली आहे.