श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कु. पूजा धुरी आणि कु. गुलाबी धुरी या साधक-भगिनींनी त्यांच्या चरणी वाहिलेली पत्ररूपी कृतज्ञतापुष्पे !
प्रिय सद्गुरु माऊली,
६.१०.२०२१ या दिवशी आपला वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या या पवित्र दिनी आम्ही दोन फुले आपल्या चरणी नतमस्तक झालो आहोत.
हे माऊली, आपल्या कृपेने आम्हा दोन कोमल फुलांना श्री गुरूंची छत्रछाया मिळाली. आपल्यामुळे या फुलांना रंग आला. आपणच या फुलांना साधनारूपी गंध दिला आणि आपल्या कृपेनेच या फुलांमध्ये सात्त्विकताही निर्माण होत आहे.
हे माते, आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचे सामर्थ्य या फुलांमध्ये नाही. ही फुले असमर्थ आहेत; परंतु आपल्या कृपेमुळे आम्हाला आसरा मिळाला, याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्हाला गुरुचरणी समर्पित करवून घ्यावे. आपल्या प्रीतीने आम्हा फुलांना वैकुंठस्वरूप रामनाथी आश्रमातील वातावरण अनुभवता येत आहे आणि त्याचा आनंद घेता येत आहे. ही आपलीच कृपा आहे.
हे आई, तूच आम्हाला चैतन्यशक्ती प्रदान करतेस. त्या चैतन्याने आम्ही नव्याने प्रफुल्लित होतो.
‘आम्हाला सदैव आपल्या चरणी ठेवावे आणि श्री चरणांची सेवा करवून घ्यावी’, अशी शरणागतीने आणि आर्ततेने प्रार्थना आहे.
पूजा करतो आनंदाने । गुलाबाच्या फुलाने ।
भाव निर्माण होऊ दे अंतरी ।
कृतज्ञता व्यक्त करण्या समर्पित व्हावे, तव चरणी ।।
कळावे,
आपल्या चरणसेविका,
– कु. पूजा धुरी, साळगाव, सिंधुदुर्ग. (१२.९.२०२१) आणि कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा