६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या तुळजापूर येथील साधिका श्रीमती पुनाबाई होरडे यांना पतीनिधनानंतर जाणवलेले सूत्र
१. पतीच्या निधनाविषयी मिळालेली पूर्वसूचना
‘श्रीमती पुनाबाई होरडे यांच्या पतीचे २५.२.२०१९ या दिवशी निधन झाले. त्या दिवशी पुनाबाई होरडे या सकाळी नित्यनियमाप्रमाणे आरशात बघून कुंकू लावत असतांना त्यांना कुंकू भेसूर वाटू लागले. त्यांना कुंकवाचा रंग काळा झाल्याचे दिसले. त्या वेळी त्यांना स्वतःचा तोंडवळाही विद्रूप दिसू लागला. त्याच दिवशी काही वेळानंतर त्यांना पतीचे निधन झाले असल्याचा निरोप आला. त्या वेळी ही पूर्वसूचनाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
२. पतीच्या निधनानंतर दु:खी असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातून मार्गदर्शन मिळून साधिकेने स्वत:ला सावरणे
श्रीमती होरडे या पतीच्या निधनानंतर पुष्कळ दुःखी झाल्या होत्या. पतीनिधनानंतर तिसर्या दिवशी म्हणजे २७.२.२०१९ या दिवशी त्या नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठल्या; परंतु त्यांना दुःखामुळे रडू येत होते. त्यांना काहीच सुचत नव्हते. त्याच वेळी त्यांना सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ समोर दिसल्या. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी त्यांना समजावून सांगितले आणि म्हणाल्या ‘जनरितीचे आपल्याला पालन करावेच लागते.’ नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘आपल्याला पुष्कळ पुढे जायचे आहे. त्यामुळे असे रडून चालणार नाही.’ त्याच वेळेस पुनाबाईंना प.पू. भक्तराज महाराज यांचे याच संदर्भातील एक भजन आठवले. त्या शांत झाल्या आणि त्यांनी स्वतःला सावरले.’ – सौ. सुनिता पंकज काळे, तुळजापूर, जि. सोलापूर. (वर्ष २०१९)
(श्रीमती पुनाबाई होरडे रहातात, त्या भागातील स्त्रिया पतीच्या निधनानंतर मंगळसूत्रात वाट्या आणि मणी न घालता काळी पोत किंवा वाट्या अन् मणी काढलेले मंगळसूत्रही घालतात. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रात काळी पोत दिसत आहे. – संकलक)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |